पर्यटन

धार्मिक स्थळे
कनकेश्वर
tour अलिबाग जवळ कोकण किनारपट्टी वरील, एक लोकप्रिय ठिकाण. येथे शंकराचे प्रसिध्द मंदिर आहे. हे मंदिर मापगाव गावात आहे. अलिबागवरुन जवळजवळ 12 किमी वर डोंगराळ भागात एका लहान टेकडी वर वसलेले असून जवळजवळ 1200 फूट उंच आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 750 पायऱ्या आहेत.
पर्यटन स्थळे
कुलाबा किल्ला
tour कुलाबा किल्ला किंवा किल्ला-इ-कुलाबा (किल्ले कुलाबा) हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशात मुंबई शहरापासून ३५ किलोमीटर दक्षिणेस अलिबागजवळ आहे. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगतच पण किनाऱ्यापासून १ ते २ किलोमीटर अंतरावर, अरबी समुद्रात आहे. तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’, अलिबागचा पाणकोट. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा!’ प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.
करमरकर यांची शिल्प
tour रायगड जिल्ह्य़ातील सासवण्यासारख्या लहानशा गावात बालपणी घरात गणपतीच्या मूर्ती साकारत पुढे जागतिक कीर्तीचे शिल्पकार बनलेले विनायक करमरकर. विनायक, सासवण्याच्या पांडुरंगपंत करमरकरांचा मुलगा. कुलाबा जिल्ह्य़ाचे (आता रायगड) कलेक्टर तपासणीसाठी सासवण्याला आले असता त्यांनी विनूने काढलेले अश्वारूढ शिवाजी महाराजांचे चित्र पाहिले. कलेची कदर करणारा एक ब्रिटिश खूश झाला नसता तर नवल. त्यांनी चित्रकाराला बोलावले. विनू कापतच गोऱ्या साहेबासमोर आला. कलेक्टर साहेबाने कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर मारली आणि त्याने विनूला चित्र-शिल्पकलेचे शास्त्रीय शिक्षण मुंबईला घेण्याचा सल्ला दिला. ‘तुझ्या चेहऱ्यावरून समजतंय. हे खर्चीक शिक्षण कसे जमणार? त्याची काळजी करू नकोस. तुझ्या शिक्षणाचा सर्व खर्च मी करीन,’ असे आश्वासन त्यांनी विनू आणि वडिलांना दिले. विनूला आकाश ठेंगणे झाले. त्याने मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत शिल्प आणि चित्रकला याचे पद्धतशीर शिक्षण पूर्ण केले. त्याला मूर्ती-पुतळे बनविण्याची छोटी-मोठी कामेही मिळू लागली. त्याची घोडदौड पाहत शासनाने त्यांना परदेशी शिक्षणासाठीही पाठवले. तिथून परतल्यानंतर बाहुल्या आणि गणपतीच्या मूर्ती घडवून शिल्पकलेचा प्रारंभ केलेल्या विनायकाने, पुण्यात उभा करण्यासाठी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा साकारला. महाराष्ट्रातील पहिला छत्रपती पुतळा प्रचंड नावाजला गेला आणि विनायकराव करमरकर भारतातील विख्यात शिल्पकार म्हणून गणले गेले.
tour
चुंबकीय वेधशाळा
tour वेधशाळेची अलिबागमधील इमारत ही १९०६ साली श्री नानाभाई मुस यांच्या कल्पक नेतृत्वाखाली बांधण्यात आली. ब्रिटीश वास्तुशास्त्रानुसार बनवली गेलेली ही इमारत अतिशय देखणी, टुमदार, व हिरव्या वनराईने वेढलेली असून ती पोरबंदरवरून मागवलेल्या विशेष दगडांपासून साकारण्यात आली आहे. प्रत्यक्ष कार्य वेधशाळेच्या मुख्य इमारतीच्या आतमध्ये एक इमारत आहे जिथे प्रत्यक्ष क्षेत्राचा संशोधनपुर्ण अभ्यास केला जातो. या इमारतीच्या दोन्ही भिंती लाकडी असून त्यांच्या आत भुसा भरलेला असतो. या सगळ्यांच्या आतमध्ये रेकोर्डिंग रूम बनविली गेली आहे जिथे तीन मोठे चुंबक तिन्ही दिशांना ठेवलेले असतात. या संपुर्ण परिसरात पांढरा नव्हे तर लाल प्रकाश वापरला जातो. या यंत्रावर फोटोपेपर लावण्यात येतो. चुंबकीय क्षेत्रातील अतिशय सुक्ष्म बदलांची व पृथ्वीच्या आतील उलाढालींची य यंत्राद्वारे चोवीस तास नोंद ठेवण्यात् येते.
सरखेल कान्होजी आंग्रे
tour कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली. १७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली.
tour
नागाव बीच
tour अलिबाग तालुक्यातील नागाव हे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्या लगत आहे. नागाव हे गाव अलिबागपासून 9 कि.मी. व मुंबई वरून 114 किमी इतक्या अंतरावर आहे. नागाव बीच स्वच्छता, water sports याकरिता प्रामुख्याने लोकप्रिय आहे. बीच सुमारे 3 किमी लांब आहे. नागांव मध्ये लहान लहान हॉटेल्स आहेत तसेच स्थानिक लोकांच्या त्यांच्या मालकीच्या जागेत कॉटेज आहेत त्यामध्ये पर्यटकांना राहण्यासाठी येथे उत्तम पर्याय आहे.