पर्यटन

धार्मिक स्थळे
बिर्ला मंदिर
tour मुरुड पासून रोहयाच्या रस्त्यावर अलिबाग कडे जाताना जे. एस. डब्लू. चा कारखाना लागतो. या ठिकाणी बिर्ला उदयोग समुहाने त्यांच्या परंपरेप्रमाणे मंदिर उभारले. पांढ-याशुभ्र रंगाचा संगमवर व टेकडयांचा नैसर्गिक उतारचा खुबीने वापर करुन झालेले बगीचे, कारंजासह प्रकाश योजना यामुळे विक्रम विनायक मंदिर म्हणजे पर्यटकांचे नंदनवन, गणेश भक्तांचे श्रध्दास्थान बनले आहे.
सिध्दीविनायक मंदिर
tour नंदाग्राम म्हणजेच नांदगाव येथील प्रख्यात ज्योतिषीग्रह जाधव कर्ते गणेश देवज्ञ व त्यांच्या कुटुंबीयांचे हे कुळदैवत श्री सिध्दीविनायक हे जागृत भक्त गणांचे लक्ष वेधून घेते. कळसावर अष्ट़दिप पावलांच्या कोरलेल्या मुर्ती उत्कृष्ट़ कलाकुसरीचा नमुना आहे. सभा मंडप देखील लक्षीका यांनी सुशोभित आणि प्रशस्त आहे. सन 1936 मध्ये हे मंदीर बांधण्यात आले. माघ शुध्द़ चतुर्थीला मंदिराच्या पटांगणात मोठी यात्रा भरते.
पर्यटन स्थळे
मुरूड-जंजिरा किल्ला
tour मुरूड तालुक्याला असलेले मुरूड-जंजिरा हे नांव किल्ल्यामुळेच लाभलेले आहे. हे तालुक्यातील पर्यटनाचे मुख्य ठिकाण आहे. 300 वर्षापुर्वी बांधलेला जंजिरा किल्ला हा वास्तुशिल्पाचा एक चमत्कार वाटतो. राजपुरी गावापासुन समुद्रात जवळपास 1 किमी अंतरावर पुर्णपणे समुद्रात वसलेला हा किल्ला आहे. मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजुला दूर्गव्दार शिल्प असुन, किल्लात दोन गोडया पाण्याचे तलाव आहेत.शस्त्रागार व दारुगोळयाचे कोठार उंचावर आहे. किल्याचा तट दगडी व मजबुत असुन, सध्या चिरे झीजले आहेत.
कासा उर्फ पदमदुर्ग किल्ला
tour मुरूड शहराच्या जवळपास कासा उर्फ पदमदुर्ग किल्ला दिसतो. मुरूड-जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी संभाजी राजे यांनी हा किल्ला बांधला आहे. तो अपुर्ण अवस्थेतच राहिला. स्वातंत्र्या नंतर त्यांचा तुरुंग म्हणुन वापर करण्यात आला. सध्या सदर किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे.
फणसाड अभयारण्य
tour सुमारे 54 चौ.मि. क्षेत्रावर पसरलेले फणसाड अभयारण्य हे मुरूड व रोहा तालुक्यात समाविष्ट आहे. हे अभयारण्य 1986 साली अधिसुचित झाले आहे. या वनराईत निसर्ग प्रेमींनी आकर्षित करण्याची क्षमता निश्चित आहे. अभयारण्याच्या एका बाजुला विस्तीर्ण समुद्रकिनारा तर दुस-या बाजुला गर्द वनराईत नटलेला डेांगराळ प्रदेश आहे. बारामाही पाण्याचे जिंवत झरे ज्यांना गाण असे संबोधतात.ते येथे आढळतात. या अभ्यरण्यात आढळणा-या प्रण्यामध्ये सांबर,भेकर, रान डुक्कर सायाळ पिसोरी व उल्लेखनीय व दुर्मिळबाब म्हणजे शेखरु आदीचा समावेश आहे. या अभयारण्यात मोठया प्रमाणात एैन,साग, किंजळ,धावडा,अंजनी. आंबा,करंज,हेद,काजु,सावर,व कुंभी हे वृक्ष तसेच गारंबीची वेल ही वनौषधी सापडते.
कोर्लई किल्ला
tour रेवदंडा खाडीच्या तोंडा जवळ साळाव पुलाजवळ ऐतिहासिक कोर्लई किल्ला आहे. सन 1521 मध्ये दिमांशु लोपिश दि. सेकर या पोर्तुगीज सैन्य़ाधिका-याने हा किल्ला बांधला असल्याचे नमुद केले आहे. हा किल्ला बरेच वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. किल्याचे प्रवेशव्दार समुद्राच्या बाजुस आहे. या ठिकाणी “ लढल्या शिवाय आत प्रवेश नाही.” असा इशारा दगडावर कोरलेला दिसतो. किल्यात 7 दरवाजे आहेत. आत मोडकळीस आलेला चर्च आहे. किल्याच्या पायथ्याशी डोंगराजवळ समुद्रात खेटून जुने दिपगृह आहे.
गारंबी धरण
tour जंजिरा संस्थानाचा पुरोगामी विचार करणारे सर सिध्दी अहमदखान यांनी व्हिटोरिया राणीच्या भारत भेटीची आठवण म्हणून गारंबीच्या जंगलातील धरणास “ व्हिक्टोरिया ज्यूबीली वॉटर वर्क्स ” हे नांव दिले. विपूल वनसंपत्ती नैसर्गिकरित्या पाणी अडवून बांधलेले हे धरण म्हणून प्रसिध्द़ आहे. शहरात पिण्याचे पाणी याच ‍ठिकाणावरुन पूर्णपणे नैसर्गिक प्रवाहाच्या वेगाचा वापर करुन केले जाते. पावसाळयात पर्यटक पाण्याच्या प्रवाहात डुंबण्यासाठी हमखास या ठिकाणी जातात.
मुरुड बीच
tour मुरुड शहराला लाभलेला मुरुडचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. येथे सुध्दा रुपेरी वाळू आहे. मुरुडमध्ये आल्यानंतर पर्यटक नेहमीच मुरुडच्या समुद्रकिना-यावर पोहण्याचा आस्वाद घेतात. मुरुड येथे सुध्दा उत्तम प्रतीची हॉटेल उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यटकांची रहाण्याची व जेवण्याची उत्तम सोय होते.