पर्यटन

धार्मिक स्थळे
श्री भवानी जगदंबा देवी देवस्थान वाशी-पेण
tour पेण पासून ६ कि.मी. अंतरावर वाशी या ठिकाणी श्री भवानी जगदंबा देवीचे मंदिर असून सदरचे देवस्थान हे शिवकालीन जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये व नवरात्रोत्सव कालावधीत मोठा उत्सव (यात्रा) साजरा करण्यांत येतो. तसेच परिसरातील भाविकांची दर्शनासाठी नित्य गर्दी असते.
महाल मि-या डोंगर
tour पेण पासून साडेतीन कि.मी. अंतरावर महाल मि-या डोंगर असून पूर्वी येथे काळया मिरीचे मळे असल्याने हे नांव पडले आहे. येथील दगडी बांधणीच्या व्याघ्रेश्वराच्या मंदिरात श्रावण महिन्यात पेण परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात.