पर्यटन

धार्मिक स्थळे
धावीर मंदीर रोहा
tour धावीर मंदीर पुरातन कालीन वारसा लाभला आहे. धावीर मंदीर हे रोहयाचे ग्रामदैवत आहे. धावीर महाराजांच्या पालकीला पोलीस खात्यामार्फत विशेष मानवंदना दिली जाते. ही परंपरा इंग्रज राजवटीपासून चालत आली आहे. तालूक्यातील व रायगड जिल्हयातील असंख्य़ लोकांचे श्रध्दास्थान आहे.
पर्यटन स्थळे
अवचितगड
tour अवचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-गोवा रस्त्यावर नागोठणे किंवा कोलाडपासून उजवीकडे फुटलेला रस्ता रोहा या तालुक्याच्या गावाला जातो. कोकणातील कुंडलिका नदीच्या तीरावरील या रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये अवचितगड हा गर्द रानाने वेढलेला किल्ला आहे, महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फूट आहे. घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
घोसाळगड
tour घोसाळगड हे रोहा शहरापासून सुमारे 10 कि.मी. अंतरावर आहे. या गडास पुरातनकालीन वारसा लाभलेला आहे. राजे शिवछत्रपती यांचे सैन्य़ या गडावर राहण्यासाठी येत असत. पावसाळयात येथे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात.
घेरासुरगड
tour घेरासुरगड हे रोहा शहरापासून सुमारे 12 कि.मी. अंतरावर आहे. निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात.
रिव्हर राफ्टींग
tour रोहा शहरापासून सुमारे 10 कि.मी. अंतरावर संभे हे ठिकाणी कुंडलिका नदीवर आहे. येथे River Rafting and adventure activity साठी व निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात.