पर्यटन

धार्मिक स्थळे
श्री. सोमजाई देवस्थान
tour रायगड जिल्हयांत श्रीवर्धन येथे सोमजाई देवीचे सुप्रसिध्द देवस्थान असुन ते जागृत देवस्थान आहे. जन-जनावर, विंचु इ. चावलेल्या व्यक्तीला त्वरित या देवस्थानात आणल्यास तिला विषबाधा न होता. ती मृत्युमुखी पडत नाही. अशी या देवस्थानाबद्दल प्रसिध्दि असुन भाविकांची नितान्त श्रध्दा आहे. माजी वहिवाटदार श्री. भाई मुरकर यांनी सांगितल्याप्रमाणे या देवस्थानचा इतिहास व माहीती पुढील प्रमाणे आहे. श्री. सोमजाई देवस्थान हे श्रीवर्धन शहरी अतिश विशाल सागर किनारा व नयनरम्य वनश्रीने नटलेल्या निसर्ग सान्निध्यात आपल्या दैवी चमत्कारासह अत्यंत प्रसिध्दी पावलेले आहे. श्री. सोमजाई देवी देवस्थान स्वयंभु असुन श्रीचे भवानी तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणुन प्रसिध्द आहे. सदरची देवता सोमजाई अशी अर्धनारी नटेश्वर स्वरुपी असुन येथे भाविकांच्या अनंत इच्छा पुर्ण होतात .असे हे नवसास पावणारे जागृत देवस्थान आहे. विशेष महत्वपुर्ण म्हणजे श्री. सोमजाई भवानी तीर्थ व श्री. हरीहरेश्वर शिवतीर्थ श्री काळभैरवासह या दोन्ही क्षेत्राचे एकाच दिवशी भक्ती श्रध्दापुर्वक दर्शन घेतल्याने श्रीक्षेत्र दक्षिण काशी चे तीर्थ पुर्ण केल्याचे पुण्य भाविकांच्या पदरी पडते व मानवी जीवनांतील विविध अडचणीचा परिहार होतो.
tour
रुपनारायण मंदिर
tour मुर्तीच्या उजव्या हातास वर मत्स्य अवतार (मासा) हा प्राण्यातील पहिला अवतार
हरिहरेश्वर मंदिर
tour येथे मुख्य मंदीर कालभैरवाचे आहे. शतक्ष दैत्याचा वध करण्यासाठी श्री. कालभैरवाचा अवतार झाला. दुसरे देवालय श्री. हरिहरेश्वराचे असुन या देवालयांत श्री. गणपती नंदी हृयांच्या मुर्ती आहेत व ब्रम्हा विष्णु महेश आणि आदीमाया पार्वतीदेवी लिंग रुपांने आहेत. यांची स्थापना अगस्तीमुनीनी केली आहे. हरिहरेश्वराची प्रदक्षिणा सोमसुत्री आहे. प्रथम श्री. कालभैरवाचे दर्शन घेऊन नंतर हरिश्वराचे दर्शन घ्यावे.
पर्यटन स्थळे
दिवेआगर समुद्र किनारा
tour दिवेआगर समुद्र किनारा
मौजे हरिहरेश्वर येथील किनारा
tour मौजे हरिहरेश्वर येथील किनारा
आरावी समुद्रकिनारा
tour आरावी समुद्रकिनारा