पर्यटन

धार्मिक स्थळे
बाल दिगंबर गणेश मंदीर
tour तालुक्या‍त कडाव येथे बाल गणेशाचे प्रसिध्द आणि जागृत देवस्थान असून प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीस भाविक मोठया प्रमाणात दर्शनासाठी येतात.
महालक्ष्मी देवीचे स्वयंभू मंदिर
tour महालक्ष्मी देवीचे स्वंयंभू मंदिर कर्जत तालुक्यातील वेणगांव येथे आहे. अश्विन महिन्यात येणा-या नवरात्रीमध्ये नऊ दिवस भाविक मोठया संख्येत दर्शनासाठी येतात. या कालावधीत मंदिर परिसरात मोठा उत्सव भरतो.
पर्यटन स्थळे
नयनरम्य धबधबा
tour कर्जत तालुक्यात भिवपुरी रोड स्टेशननजीक निसर्गरम्य वातावरणात नयनरम्य धबधबे आहेत. पावसाळयामध्ये मुंबई, पनवेल, नवी मुंबई येथून मोठया प्रमाणात पर्यटक दैनंदिन धावपळीच्या आयुष्यातून विश्रांतीसाठी येतात. विशेषतः महाविद्यालयीन युवक-युवती मौजमजा तसेच सहलींसाठी येतात.
कोंढाणे लेणी
tour कोंढाणे येथील 16 बुध्दाकालिन पुरातन लेण्या. पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे.
माथेरान - वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण
tour भारतातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण माथेरान हे कर्जत तालुक्यात आहे. विशेषतः मुंबई पुण्यासारख्या शहरी भागातील पर्यटक विरंगुळयासाठी मोठया प्रमाणात माथेरान येथे येतात. माथेरान हे आशिया खंडातील एकमेव वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण आहे.