• Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide

कर्जत तालुका


सुस्वागतम्

      निसर्गाने मुक्तहस्ते सृष्टीसौंदर्याची उधळण केलेला पश्चिम किनारपट्टीवरील अतिशय रमणीय असा प्रदूषणमुक्त भूप्रदेश, आंब्याच्या वनात लपलेली टुमदार गांव, ऐतिहासिक परंपरा असलेले किल्ले व दुर्ग, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जागृत देवस्थाने, सहयाद्रीच्या कुशीमधील थंड हवेची ठिकाणे, सांस्कृतिक व पौराणिक वारसा, लोककला, कोकणी जेवण हे सर्व प्रकार कर्जत तालुक्याच्या परिसरात एकत्रितपणे आढळतात. कडाव येथील बाल दिगंबर मंदिर, वेणगांव येथील महालक्ष्मी मंदिर तसेच पळसदरी येथील स्वामी समर्थ यांचा मठ प्रसिध्द आहे. मुंबई आणि पुणे यांना जोडणारा कर्जत हा मध्यवर्ती तालुका आहे.

      महात्मा गांधीजींच्या सन 1942 च्या ‘छोडो भारत’ चळवळीत सक्रीय सहभागी असलेले आणि भूमिगत राहून कार्य केलेले विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ वीर भाई कोतवाल हे कर्जत तालुक्याचे सुपुत्र होते. तालुक्यात टेकिंगसाठी प्रसिध्द असलेला पेठ किल्ला अणि बुध्दीकालिन कोंढाणे लेणी आहेत. कर्जत तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती असून भात, नाचणी, वरी, कडधान्ये, तेलबिया, ही प्रमुख पिके आहेत.

      विविध शैक्षणिक व दळणवळणाच्या सुविधा, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, वैद्यकीय सुविधा इ. मुळे कर्जत तालुका प्रसिध्द आहे. प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण व पर्यटन स्थळ माथेरान, मिनी ट्रेन, उंचावरुन पडणारे दुधाळ धबधबे हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

Tahasildar