पर्यटन

धार्मिक स्थळे
श्री. वीरेश्वर मंदिर
tour महाड तालुक्याचे ग्रामदैवत श्री. वीरेश्वर महाराज यांचे मंदिर महाडच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. दरवर्षी महाशिवरात्री ला वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
शिवथरघळ
tour श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या ठिकाणाला महत्व प्राप्त झाले आहे. समर्थांनी दासबोध हा महान ग्रंथ याच ठिकाणी लिहिला असे मानले जाते. अंदाजे 38 मीटर लांब व २२ मीटर रुंद असलेल्या या घळीत अंदाजे १२५ माणसे बसू शकतात. पावसाळ्यात ५० फुटावरून पडणारा धबधबा फारच आकर्षक आहे.
पर्यटन स्थळे
चवदारतळे महाड
tour या तळ्यात 14 विहीर झरे आहेत. यावरून त्यास चवदारतळे असे संबोधले जाते. सन १९१८ मध्ये हे नगरपालिकेच्या ताब्यात दिले. २० मार्च १९२७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदारतळे असृश्यासाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह करून दलित क्रांतीचा प्रारंभ केला. महाड नगरपालिकेने ऐतिहासिक चवदारतळ्याचे सुशोभिकरण केले असून तळ्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १० फुटी ब्रांझचा पुतळा उभारला आहे. तसेच सभाग्रह बगीचा तयार करण्यात आले आहे.
किल्ले रायगड
tour महाड पासून 24 किमी अंतरावर असलेला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला. १६५६ मध्ये रायरी जिंकल्यावर महाराजांनी १६६२ मध्ये त्याचे नाव बदलून रायगड असे ठेवले.या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्यभिषेक सोहळा पार पडला.तसेच महाराजांचा मृत्यू देखील याच किल्ल्यावर झाला.शिवसमाधी याच किल्ल्यावर पहावयास मिळते.

किल्ल्यावर खुबलढा बुरुज, नाना दरवाजा, महादरवाजा, हत्तीतलाव, गंगासागर तलाव, कोलिम तलाव, मनोरे, राणीवसा, राजभवन, सदर, मेघडंबरी, नगारखाना, हिरकणी टोक, होळीचा माळ,वाघ दरवाजा, बाजारपेठ जगदीश्वर मंदिर, शिवसमाधी, भवानी टोक, टकमक टोक अशा इमारती व प्रेक्षणीय स्थळे पहावयास मिळतात.