पर्यटन

धार्मिक स्थळे
चंडिका देवी
tour इ.स.1585 चे सुमारास मलिक अहमदने “तळेगड” हा डोंगरी किल्ला उभारला. तोबहामनी राजा असल्यामुळे हिंदूव्देष्टा नव्हता. त्याने आजूबाजूच्या भागातून बलुतेदारांना व वतनदारांना बोलावून वतने सुरु केली.ग्रामस्थांनी चंडिका भवानी ग्रामदैव तम्हणून स्विकारली. त्याच वेळी गावाची वेस ठरवली व वेशी वर मारुतीचे मंदीर बांधले. इ.स.1758 चे सुमारास दिल्ली सुलतानाच्या चिथावणीमुळे ग्रामदैवतेचे मुर्तीभंग झाली होती.परंतू वतनदारांनी चंडीकाभवानी देवीची नविन मुर्ती बनविली, परंतू तिलाकौल न मिळाल्यामुळे जुन्यामुर्तीस शेंदुराचा लेप देऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली आजही दोन्ही मुर्ती देवालयात आहेत. याजुन्या मंदिरांची फारमोठया प्रमाणावर नुतनिकरण करण्याचेकाम कै.दत्तात्रय रामकृष्ण देशमुख यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने पूर्ण केले. आजत्यांचे विश्वस्त मंडळ असून डॉ.म.ग.जोशीहे प्रमुख विश्वस्त सहका-यांच्या मदतीने काम पाहतात. श्री.चंडिका देवीची यात्रा मोठया प्रमाणात भरते व त्याबरोबर बापूजी देवयात्रा, श्री.रामनवमी यात्रा,श्री.द्रोणागिरी यात्राही भरत असतात व होळीमहोत्स्व, नवरात्रोत्सव व दहिकालाउत्सव संपन्न होत असतो.
पर्यटन स्थळे
कुडे लेणी
tour तळे गावापासून 10 मैल अंतरावर पश्चिमेस कुडे या गावाजवळ “बौध्दकालीन लेणी” आहेत.जवळच मांदाड हे गाव खाडी लगत आहे. मांदाड या बंदराची वैशिष्टे त्याच्या चारही बाजूला डोंगर असून त्यामुळे वादळ वारे या बंदरात येत नाहीत. तेथून सूर्यास्त अप्रतिम दिसतो. कारण खाडीतील प्रतिबिंब व डोंगराआडचा सूर्य एकाचवेळी अंतर्धान पावतो. या बंदराला “डोअर्स ऑफ अरेबियन सी” असेही म्हणतात.
तळेगड
tour “तळेगड” हा रायगड जिल्ह्रयातील माणगाव तालुक्याच्या पश्चिमेस इंदापूरपासून 15 क‍ि.मी. अंतरावर आहे. व समुद्र सपाटीपासून 1000 फुट ऊंचीवर असून त्याचे पायथ्याशी “तळे” या गावाची मुख्य वस्ती आहे. पेशवे यांनी सिध्दी या हबशी राजाच्या जंजीरा या किल्यावर स्वारी केली तेव्हा राजपूरी प्रांताचा बंदोबस्त केला होता. त्याचवेळी तळे या गडाचे भोवतालची 104 गावे मिळून “तळेमहाल” (पेटा) व त्याचे मुख्य ठाणे महल कचेरी तळेगडाच्या पायथ्याशी स्थापन केली. त्याचे अवशेष आजही पहावयास मिळतात. अद्यापही 26 जानेवारी, 1मे व 15 ऑगस्ट अशा राष्ट्रीय महत्वाच्या दिवशी तेथे ध्वजवंदन होते. व बाहेरून येणारी मंडळी आर्वजून तळे गडावर जातात.